सुशांत सिंग राजपूत जगातून गेला पण जातांना अनेक प्रश्न मागे सोडून गेला. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी पडला, असे आता अनेकजण उघडपणे बोलत आहेत. तूर्तास याला काहीही आधार नाही. मात्र सोशल मीडियावर यानिमित्ताने काही लोकांवर उघडउघड आरोप होत आहेत. करण जोहर व त्याची गँग तर प्रचंड ट्रोल होतेय. करण जोहर व त्याच्या गँगने सुशांत सारख्या अनेकांना बॉलिवूडमध्ये मोठे होऊ दिले नाही, त्यांना काम मिळू नयेत म्हणून प्रयत्न केलेत, असे एक ना अनेक आरोप ऐकायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या एका मुलाखतीचा एक भाग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या मुलाखतीत आयुष्यमान करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनबद्दल बोलला होत. ‘आम्ही फक्त स्टार्ससोबत काम करतो,’ असे धर्मा प्रॉडक्शनने म्हटले होते.

#AyushmannKhurrana #DharmaProductions #lokmat #karanjohar #sushantsinghrajput #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber